⚡बांदा ता.२४-: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दि. २४ रोजी रात्री आठ वाजता गव्याने प्रवेश केला. अनेक जंगली जनावरे आता लोकवस्तीमध्ये घुसू लागली आहेत. त्यात गव्यांचा कळप मोठ्या प्रमाणात शेती, बागायतीमध्ये घुसून नासधूस करत असतानाच मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा येथे गव्याने प्रवेश केल्यामुळे एकच खळबळ माजली. तेथील कर्मचाऱ्यांनी गव्याला बाहेर हाकलून दिले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गव्याचा शिरकाव…
