⚡मालवण ता.०५-:
सावंतवाडी येथील दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे शिक्षक दिनानिमित्त गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये मालवण तालुक्यातील दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल, मालवण चे शिक्षक श्री. राजू भाऊसाहेब देसाई व मालवण रेवतळे शाळेचे मुख्याध्यापक श्री. देविदास प्रभुगांवकर यांना गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व ग्रंथभेट असे आहे. येत्या काही दिवसात यां पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री. राजू देसाई व श्री. देविदास प्रभुगांवकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.