Headlines

आचरा येथे २३ आक्टोबर रोजी जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा

मालवण दि प्रतिनिधी

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक २३ आक्टोबर रोजी रात्रौ ठिक ९ वाजता देवूळवाडी मित्र मंडळ पुरस्कृत जिल्ह्यास्तरीय भव्य खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्पर्धकास १०००१/- रुपये पारितोषिक व चषक, द्वितीय विजेत्यास पारितोषिक ७००१ रुपये व चषक, तर तृतीय विजेत्यास पारितोषिक ५००१ रुपये व चषक असून उत्तेजनार्थ प्रत्येकी १२००/- रुपये दिले जाणार आहेत.

प्रथम येणाऱ्या सात संघानाच प्राधान्य दिले जाणार आहे. सादरीकरणासाठी वेळ २० मिनिटे असून अधिक माहिती साठी अर्जुन बापर्डेकर 9420082320, नितिन घाडी 9307714441 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page