Headlines

वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदीरातील 21 दिवसांचा बाप्पाला संकष्टी चतुर्थी निमित्ताने 5 हजार 121 मोदकांचा नैवेद्य…

⚡सावंतवाडी ता.१०-: वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदीरात 21 दिवसांचा सार्वजानिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात व भक्तिमय वातावरणात सुरू आहे. गणेशोत्सवातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने येथील भाविकांनी सुमारे 5 हजार 121 मोदकांचा नैवेद्य श्रींचरणी अर्पण केला. गणेशोत्सवातील संकष्टी निमित्त सकाळी पुरोहित गणेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. यानतंर दुपारी महाआरती करण्यात आली. यावेळी श्रींचरणी सहस्त्र…

Read Full News

शहरातली एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत तिघांच्या मुसक्या आवळल्या…!

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी पोलिसांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. आज पहाटे शहरातली एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी कारवाईच सत्र सुरूच ठेवल आहे. याबाबत अधिक माहिती आहे अशी की, गोपनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार होळीचा खुंट पांगम गल्ली सावंतवाडी येथे जुगार…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दशावतार कलाकार आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन…

दशावतारी कलाकारांच्या आरोग्याची तपासणी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या माध्यमातून घेतली जाईल:भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची ग्वाही.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कला साता समुद्रापार गेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अण्णा…

Read Full News

सावंतवाडी तालुका जेसीबी मालक संघटनेची बैठक संपन्न…!

⚡बांदा ता.१०-: सावंतवाडी तालुका जेसीबी मालक संघटनेची बैठक दिनांक ९ सप्टेंबर रोजी देवांगी सभागृह, इन्सुली येथे पार पडली. या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष उमेश पेडणेकर अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत मुख्यतः दोन विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली –1. सन 2025-26 साठी दरपत्रक निश्चित करणे2. परप्रांतीय जेसीबी मालकांच्या अतिक्रमणाविरोधात भूमिका ठरवणे ठरविण्यात आलेले दरपत्रक (2025-26)• बेसिक प्रति तास…

Read Full News

बांदा येथे शेतकरी सभेचे आयोजन…!

⚡बांदा ता.१०-:शेतकरी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी व त्यांना काजू बोर्ड कार्यकारिणीत प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी गुरुवार दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता बांदा गडगेवाडी येथील दूध संस्था कार्यालयात शेतकरी सभा आयोजित करण्यात आली आहे. अलीकडेच शासनाने जाहीर केलेल्या काजू बोर्ड कार्यकारिणीत केवळ राजकीय नेते व पुढाऱ्यांना स्थान मिळाले असून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही….

Read Full News

बेकायदा गुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर बांदा पोलिसांची कारवाई…!

⚡बांदा ता.१०-: निगुडे येथुन गोव्यात बेकायदा गुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आज सकाळी 7 वाजता बांदा पोलिसांनी तपासणी नाक्यावर कारवाई केली. स्थानिकांनी टेम्पोच्या चाकातील हवा सोडून कारवाईची मागणी केली.टेम्पोतुन बैलजोडीची होणारी वाहतूक हि बेकायदा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत टेम्पो पोलीस ठाण्यात नेण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

Read Full News

लोकशाहीला घातक जनसुरक्षा कायदा रद्द करा…

जिल्हाप्रमूख संदेश पारकर:ठाकरे शिवसेनेची कणकवली प्रांताधिका-यांमार्फत सरकारकडे मागणी,सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी.. कणकवली : महायुती सरकारने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा” लागू करणार असल्याची तरतूद विधिमंडळात करण्यात आली आहे. या कायद्याविरोधात संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा जनविरोधी, घटनाविरोधी, लोकशाही चा हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन कणकवलीत जिल्हाप्रमुख…

Read Full News

सिंधुदुर्ग ओबीसी महासंघाची आज तातडीची सभा…

ओबीसी महायल्गार मेळावाबाबत चर्चा होणार.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाची तातडीची सभा आज बुधवार दिनांक 10/09/25 रोजी सायं ठीक 4.30 वाजता मराठा हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे.यावेळी खालील विषयांवर चर्चा करून एकमताने निर्णय घेतले जाणार आहेत.1) ओबीसींचा महायल्गार मेळावाबाबत चर्चा करणे.2) संभाव्य नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत,…

Read Full News

..नाहीतर कवठीहुन एकही बस कुडाळला येणार नाही !

कोरजाई बसच्या उशिरावरून ठाकरे सेना आक्रमक.. कुडाळ : कुडाळ ते कोरजाई ही बस सेवा कित्येक वर्षे सुरू आहे. पुरेसे प्रवाशी असलेली ही बस कुडाळ वरुन सायंकाळी ६ .४० वा न सुटता नेहमीच उशिराने सुटते. येत्या दोन दिवसांत बस वेळेवर न सुटल्यास कवठी येथुन एकही बस कुडाळ येथे येऊ देणार नाही, असा इशारा कवठी उपसरपंच सौ….

Read Full News

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.१०-: राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे हे गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत.गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचे रत्नागिरीत आगमन होईल. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेड या कंपनीचे अधिकारी आणि काजू महामंडळाच्या संचालकांची बैठक आयोजित…

Read Full News

You cannot copy content of this page