⚡सावंतवाडी ता.१०-: वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदीरात 21 दिवसांचा सार्वजानिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात व भक्तिमय वातावरणात सुरू आहे. गणेशोत्सवातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने येथील भाविकांनी सुमारे 5 हजार 121 मोदकांचा नैवेद्य श्रींचरणी अर्पण केला.
गणेशोत्सवातील संकष्टी निमित्त सकाळी पुरोहित गणेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. यानतंर दुपारी महाआरती करण्यात आली. यावेळी श्रींचरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावेळी गौरेश मिशाळ यांनी श्रींची पूजा केली. गणेशोत्सवात रोज भजनासह धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. आज ५ हजार १२१ मोदकांचा नैवेद्य श्रींचरणी अर्पण करण्यात आला. यावेळी हनुमान मंदिर उत्सव समिती अध्यक्ष दीपक म्हापसेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, अण्णा म्हापसेकर, सुरेश भोगटे, महावीर चेंडके, सुभाष आळवे, धोंडी दळवी, शरद सुकी, महादेव गावडे, मंगेश परब, प्रकाश मिशाळ, प्रकाश सुकी, वैभव म्हापसेकर, नरेश जीवने , डॉ. दादा केसरकर, संजय म्हापसेकर, वैशाख मिशाळ, सतीश नार्वेकर, महेश म्हापसेकर,अंकिता नेवगी, धिरेंद्र म्हापसेकर, आदींसह वैश्यवाडा येथील शेकडो रहिवासी उपस्थित होते.
दरम्यान, मंगळवार 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रींची भव्यदिव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून यात देवीचा गोंधळ ही संकल्पना राहणार असून विविध कार्यक्रम तसेच भजन, हलगी वादन आदींचा समावेश असणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव कमिटी तर्फे करण्यात आले आहे.