शहरातली एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत तिघांच्या मुसक्या आवळल्या…!

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी पोलिसांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. आज पहाटे शहरातली एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी कारवाईच सत्र सुरूच ठेवल आहे.

याबाबत अधिक माहिती आहे अशी की, गोपनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार होळीचा खुंट पांगम गल्ली सावंतवाडी येथे जुगार अड्ड्यावर आज पहाटे 4.30 वाजता छापा टाकण्यात आला. यात तीन इसम मिळाले असून बाकीचे पोलिसांची चाहूल लागल्याने पळून गेले. या पळून गेलेल्यांचा शोध सुरू आहे. जुगार अड्ड्याचा चालक हेमंत रंकाळे व इतर दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

जागीच मिळून आलेला मुद्देमाल कॅट, जुगारासाठी वापरलेले पैसे, जुगाराचा पाल, तसेच त्यांचे मोबाईल असा एकूण 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, माधुरी मुळीक, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे, पोलीस शिपाई संभाजी पाटील, (चालक) चव्हाण त्यांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

You cannot copy content of this page