वेंगुर्ला येथे आंबा काजू बागायतदार यांचा भव्य मोर्चाद्वारे एल्गार…

वेंगुर्लेत आंबा – काजू प्रोससिंग कारखाना उभारणार : संजय गावडे..

⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला बसस्थानक श्री साईबाबा मंदिर ते तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला पर्यंत वेंगुर्ला
तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना व तालुक्यातील आंबा-काजू बागायतदार यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन छेडल्यानंतर वेंगुर्ला तहसीलदार यांना विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. याबाबत 6 मार्च 2026 पर्यन्त योग्य कार्यवाही न झाल्यास 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना अध्यक्ष तथा विद्यमान उभादांडा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे,
उपाध्यक्ष पांडुरंग गावडे,
सचिव स्वप्निल शिरोडकर, अन्य पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव एम. के. गावडे, आंबा काजू बागायतदार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, प्रगतशील शेतकरी प्रकाश गडेकर, माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, माजी सभापती प्रफुल्लचंद्र परब, माजी नगरसेवक नागेश गावडे, आडेली जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, नगरसेवक प्रीतम सावंत, संदेश निकम, प्रणव वायंगणकर, शीतल आंगचेकर, सुषमा प्रभूखानोलकर, भाजपा युवा मोर्चाचे हितेश धुरी – कमलेश गावडे – भूषण आंगचेकर, माजी जि. प. सदस्य मकरंद परब, आडेली सोसायटीचे माजी चेअरमन समिर कुडाळकर, तुळस माजी सरपंच विजय रेडकर, वजराट गिरेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव परब, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख शैलेश परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर,बंड्या धर्णे, प्रशांत मुंडये, काजू बागायतदार संतोष गाडगीळ आदीसह संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यातील आंबा- काजू बागायतदार, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी धरणे आंदोलन झाल्यानंतर तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यामध्ये क्षेत्र मर्यादेचा निकष काढून टाकून प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई जाहीर करावी.
हवामानातील बदलामुळे आंबा-काजू पिकाचे नुकसान झालेल्या बागायतदारांना भरपाई मिळावी. काजू पिकासाठी हेक्टरी नुकसान भरपाई 3 लाख जाहीर करावी. पंचनामे न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी,आदी मागण्या या निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे नुकसान भरपाई जाहीर करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मोठ्या उद्योजकाशी चर्चा झाली असून लवकरच वेंगुर्ला तालुक्यात आंबा – काजू आदी पिकांवर प्रोससिंग करणारा कारखाना उभारणार असून जिल्ह्यातील शेती उत्पादनाला चांगला भाव मिळवून देण्यात येईल. असे आश्वासन दिले असून आपण ते पूर्णतःवास नेणार असून नेहमी शेतकरी बागायदार यांच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांना न्याय मिकवून देणारं आहे, अशी माहिती यावेळी नवनिर्वाचित जि. प. सदस्य संजय गावडे यांनी दिली. “
यावेळी आंबा काजू नुकसान भरपाई – मिळालीच पाहिजे, आमची मागणी मान्य करा, आंबा काजू बागायतदार शेतकरी बांधवांच्या एकजूटीचा- विजय असो, कोण म्हणतो देणार नाही- घेतल्याशिवाय जाणार नाही.. आदी जोरदार घोषणा देत वेंगुर्ला शहर परिसर दणानून गेला होता. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात होता.

You cannot copy content of this page