Headlines

बी.फार्मसीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत…..

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे पडताळणी केंद्र उपलब्ध….

⚡सावंतवाडी ता.०३-: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष – सीईटी सेल मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बी.फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी १९ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेनुसार ऑनलाइन अर्ज नोंदणी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत ३१ जुलै ते १० ऑगस्ट अशी आहे. त्यानंतर ६ ते १२ ऑगस्ट दरम्यान कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चितीकरण करण्यात येणार असून १३ ऑगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. या यादीवरील हरकती १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन सादर करता येणार आहेत.

एमएचटी-सीईटी (पीसीएम व पीसीबी) परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे बी.फार्मसी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रथम वर्ष बी.फार्मसी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. कागदपत्र पडताळणीची सुविधा ई-स्क्रुटिनी तसेच प्रत्यक्ष पडताळणीद्वारे उपलब्ध आहे. प्रत्यक्ष पडताळणीसाठी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे सुविधा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या 9823916005 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page