⚡ओरोस, दि. ३-: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयात सचिन अडसूळ यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयातील सतीश कोरे, स्वप्नाली कुंभार, अमित राणे, शंकर आडेलकर आदी उपस्थित होते.
सचिन अडसूळ यांनी यापूर्वी कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार, प्रसारमाध्यमांशी समन्वय तसेच सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर यामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
अडसूळ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले सन २०१९च्या बॅचचे वर्ग-१ अधिकारी आहेत. माहिती व जनसंपर्क विभागात येण्यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद, पुणे येथे सुमारे १२ वर्षे विविध पदांवर सेवा बजावली आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून, ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या योजना, विकासकामे आणि लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासोबतच प्रसारमाध्यमांशी समन्वय अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अडसूळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले.
फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी:
