⚡मालवण ता.०३-:
मालवण पोलिस ठाणे पोलिस निरीक्षकपदी अतुल माधवराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची बदली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची नियुक्ती झाली असून त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.
पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे मूळ सातारा पुसेगाव येथील आहेत. २००१ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून नवी मुंबई जेएनपीटी येथून त्यांची पोलीस दलातील सेवा सुरू झाली. नांदेड देगलूर पोलीस ठाणे, नवी मुंबई, पनवेल, करंबोली येथे अधिकारी म्हणून, जेएनपीटी वाहतूक प्रभारी अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला, वैभववाडी येथे प्रभारी अधिकारी म्हणून तर कणकवली पोलिस ठाणे, नियंत्रण कक्ष ओरोस याठिकाणी त्यांनी सेवा बजावली. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांची मालवण पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
