महिला दिनानिमित्त ‘घे भरारी’चे झुंबा उपक्रम व बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.२६-: घे भरारी फाउंडेशन यांच्या वतीने महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी विशेष झुंबा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत काझी शहाबुद्दीन हॉल येथे हा उपक्रम पार पडणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मार्च महिन्यात कोणतीही फी आकारली जाणार नसून जास्तीत जास्त महिला व युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता शिव उद्यान येथे भव्य व बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाजात भरीव योगदान देणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून आकर्षक स्पॉट प्राईजेस व लकी ड्रॉचीही सोय करण्यात आली आहे. याशिवाय खास नृत्य, गाणी आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणेही रंगणार आहेत.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘घे भरारी’मधील महिलांकडून सादर होणारा दशावतारी नाट्यप्रयोग होय. त्यामुळे परिसरातील सर्व महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा रेखा कुमठेकर, कार्यकारी अध्यक्षा मेघना राऊळ, उपाध्यक्षा संध्या पवार, सचिव सलोनी वंजारी व खजिनदार स्वप्नाली कारेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page