Headlines

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हे पुरस्कार अभियान निमित्त मालवणात 12 रोजी कार्यशाळा…

⚡मालवण ता.१०-:ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षांपासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हे पुरस्कार अभियान राबवीण्यात येत आहे. या अभियानात मालवण…

Read Full News

आचरा चोरी प्रकरणातील दोन संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी…

⚡मालवण ता.१०-:आचरा पिरावाडी येथील समिधा गणपत चौगुले यांच्या घरात पाहुणी म्हणून आलेल्या ऋतुजा करुणाघन जोशी या १९ वर्षीय नवविवाहितेने चौगुले यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे अडीज लाख रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी ऋतुजा जोशी हिच्यासह तिचा पती साहिल शकील आजरेकर (वय २४, रा. मालवण) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून…

Read Full News

कुडाळ मध्ये १३ सप्टेंबरला चिमणी पाखरं प्रस्तुत ‘तारका’…

पहिलाच कार्यक्रम सर्वांसाठी मोफत:सुनील भोगटे आणि रवी कुडाळकर यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.१०-: चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमी, कुडाळ प्रस्तुत आणि उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका… नृत्याचा सुरेख प्रवास’ हा कार्यक्रम शनिवारी १३ सप्टेंबरला कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. तारका या कार्यक्रमाचा हा पहिलाच शो असून तो सर्वांसाठी मोफत आहे. सुंदरी फेम सेलिब्रिटी…

Read Full News

मिहिर मोंडकर यांचे*सेट परीक्षेत यश…

⚡सावंतवाडी ता.१०-: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने सहाय्यक प्राध्यापकपदासाठी घेतलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत सावंतवाडी येथील मिहिर राजेश मोंडकर यांनी यश मिळविले. त्यांनी लॉ विषयातून सेट परीक्षा दिली होती. महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण एक लाख दहा हजार ४१२ विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यातील ९० हजार ३६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत…

Read Full News

जन सुरक्षा कायदा रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरू…

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन ; सावंतवाडीत ठाकरे शिवसेना एकवटली.. ⚡सावंतवाडी ता.१०-: जनसामान्याचा आवाज दाबण्याचे काम जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकार करत आहे. या विरोधात शिवसेना म्हणून आम्ही जनसामान्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा कायदा रद्द होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरूनही आंदोलन छेडू, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला. ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून आज येथे प्रांताधिकारी…

Read Full News

सिंधुदुर्ग राजा’ समोर उद्या देवगड-इळये येथील दिंडी भजन…

⚡कुडाळ ता.१०-: सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये उद्या गुरुवार ११ सप्टेंबर रोजी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरसेवकांच्यावतीने देवगड इळये येथील ६० कलावंतांच्या संचात आई महालक्ष्मी प्रसादिक वारकरी दिंडी भजन व कुडाळ येथील स्वरगंधार हे कार्यक्रम सादर होणार आहे.सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये नगरसेवकांच्या वतीने उद्या गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये सायं. ४ वाजता…

Read Full News

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा १७ सप्टेंबरला शुभारंभ…

प्रफुल्ल वालावलकर:ओरोस येथे ११ सप्टेंबरला जिल्हास्तरीय तर कुडाळमध्ये १२ सप्टेंबरला कार्यशाळा.. कुडाळ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ येत्या १७ सप्टेंबर पासून होत आहे. स्पर्धात्मक स्वरूप असलेल्या या अभियानाबाबतची जिल्हास्तरीय कार्यशाळा ११ सप्टेंबरला ओरोस येथे तर तालुकास्तरीय कार्यशाळा १२ सप्टेंबरला सकाळी १० वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे होणार आहे. अशी माहिती कुडाळचे गट विकास…

Read Full News

मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडशीट भेट…!

⚡सावंतवाडी ता.१०-: मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडशीट भेट स्वरूपात देण्यात आल्या. वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवाळे, रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य देव्या सूर्याजी यांच्याकडे त्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी जीवनरक्षा प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसूरकर, प्रथमेश प्रभू तसेच सावंतवाडी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष अब्दुलरहेमान करोल, उपाध्यक्ष रफिक मेमन, सेक्रेटरी चाँदमैनुद्दिन करोल, जॉ….

Read Full News

नगर वाचनालयाच्या पुरस्कारांचे १४ सप्टेंबर रोजी वितरण…!

⚡वेंगुर्ला ता.१०-: नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेले आदर्श शिक्षक, शिक्षिका व आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण रविवार दि.१४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे.

Read Full News

एलसीबी पीएसआय रामचंद्र शेळकेंसह कणकवली पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

⚡कणकवली ता.१०-: एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद सुपल, पोलीस हवालदार पांडूरंग पांढरे यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी मंगळवारी दिले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा सिंधुदुर्गमध्ये कार्यरत असलेले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रामचद्र शेळके यांची पोलीस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग येथे…

Read Full News

You cannot copy content of this page