सिंधुदुर्ग राजा’ समोर उद्या देवगड-इळये येथील दिंडी भजन…

⚡कुडाळ ता.१०-: सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये उद्या गुरुवार ११ सप्टेंबर रोजी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरसेवकांच्यावतीने देवगड इळये येथील ६० कलावंतांच्या संचात आई महालक्ष्मी प्रसादिक वारकरी दिंडी भजन व कुडाळ येथील स्वरगंधार हे कार्यक्रम सादर होणार आहे.
सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये नगरसेवकांच्या वतीने उद्या गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये सायं. ४ वाजता कुडाळ येथील स्वरगंधार हे भक्ती गीतांचा कार्यक्रम तर सायं. ६ वा. देवगड येथील आई महालक्ष्मी प्रसादिक वारकरी दिंडी भजन मंडळाचा दिंडी व भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन नगरसेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page