देवगड हायस्कूलमध्ये’ मराठी भाषा गौरव दिन ‘मोठ्या उत्साहात साजरा…

⚡देवगड ता.२७-: देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूल आणि याच शाळेच्या मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांमध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबद्दल आपली मनोगते व्यक्त केली. मराठी भाषेच्या स्तुती वर आधारित विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. यावेळी प्रभात फेरीचे आयोजन हायस्कूल ते बस स्थानक या ठिकाणी करण्यात आलेले होते. बस स्थानकावर देखील विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मराठी विषय शिक्षक भीमराव येडगे यांनी या गौरव दिनानिमित्त मराठी भाषेबद्दल ची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या दिनानिमित्त प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, वासुदेव, पिंगळा, आणि विविध संतांच्या वेशभूषा साकारलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी यावेळी मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी मुख्याध्यापक श्री प्रविण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्वर कुंभरे,प्राथमिक विभागातील अस्मिता मिराशी, प्रियांका बांदकर आणि प्राजक्ता मिरजकर आधी शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमासाठी पालक वर्गाचे तसेच वाहतूक पोलीस श्री. प्रविण सावंत, देवगड बस स्थानक यांचे चांगले सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page