एर्टिगा कारची धडक बसून बोलेरो गाडी पलटी…

वेत्ये येथील घटना: घटनास्थळी सरपंच गुणाजी गावडे यांनी धाव घेत केली मदत..

सावंतवाडी ता.२७-: वेत्ये येथे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बोलेरो गाडी व मारुती सुझुकी एर्टिगा कार यांच्यात झालेल्या अपघातात बोलेरो पिकअप वाहन पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेत्ये येथे रस्ता ओलांडत असताना बोलेरो पिकअपला मागून भरधाव येणाऱ्या एर्टिगा कारने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की बोलेरो वाहन रस्त्यावरच पलटी झाले. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली.सुदैवाने दोन्ही वाहनांतील चालक बचावले असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. घटनास्थळी वेत्येचे सरपंच गुनाजी गावडे यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले.अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

You cannot copy content of this page