कुडाळ मध्ये १३ सप्टेंबरला चिमणी पाखरं प्रस्तुत ‘तारका’…

पहिलाच कार्यक्रम सर्वांसाठी मोफत:सुनील भोगटे आणि रवी कुडाळकर यांची माहिती..

⚡कुडाळ ता.१०-: चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमी, कुडाळ प्रस्तुत आणि उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका… नृत्याचा सुरेख प्रवास’ हा कार्यक्रम शनिवारी १३ सप्टेंबरला कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. तारका या कार्यक्रमाचा हा पहिलाच शो असून तो सर्वांसाठी मोफत आहे. सुंदरी फेम सेलिब्रिटी नृत्यांगना तारका दीक्षा नाईक हिच्यासह एकूण १४ नृत्य कलाकारांच्या संचात सलग दोन तास हा शो चालणार आहे. याची संकल्पना चिमणी पाखरंचे सल्लागार सुनील भोगटे यांची असून नृत्य दिग्दर्शन रवी कुडाळकर यांचे आहे. सर्वानी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अस आवाहन चिमणी पाखरं डान्स ऍकॅडेमीच्या वतीनं सल्लागार सुनील भोगटे आणि अध्यक्ष रवी कुडाळकर यांनी केलं आहे. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.भोगटे आणि श्री.कुडाळकर यांनी याबाबत माहीती दिली. त्यांच्या समवेत तारकाचे निर्माते उमेश पाटील, सौ.स्वाती पाटील, सौ.वेदिका सावंत, सुंदरी फेम सेलिब्रेटी नृत्यांगणा कु.दिक्षा नाईक, निखिल कुडाळकर, तन्मय आईर तसेच सर्व कलाकार उपस्थित होते.
चिमणी पाखरं अकॅडमीने २१ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने तारका या विशेष शो चे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध प्रकारच्या नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे. दोन तासांचा हा कार्यक्रम निश्चितच यादगार ठरेल. यात नृत्यांगना दिक्षा नाईकसह संजना पवार, साक्षी परब, सिमरन नायर, दुर्वा परब, विशाखा धामापूरकर, तनिषा नाईक, सलोनी सावंत, अंतरा ठाकूर, प्राची जाधव, युक्ती हळदणकर, चिन्मयी सावंत, निधी केळुसकर, प्राची पाटकर व निखिल कुडाळकर या कलाकारांचा सहभाग आहे.
सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन श्री.भोगटे व श्री.कुडाळकर यांनी यावेळी केले.
यावेळी तारका या डान्स शोचे आणि मोफत प्रवेशिकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकार यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page