मालवण येथे १ मार्च रोजी शासकीय योजनांचे महाशिबीर…

⚡मालवण ता.२७-:
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, तालुका विधी सेवा समिती, मालवण, जिल्हा मुलकी व पोलीस प्रशासन सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर रविवारी, १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती, सिंधुदुर्ग श्याम चांडक यांच्या हस्ते होणार असून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती, सिंधुदुर्ग फरहान दुभाष यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, महाराष्ट्र अॅण्ड गोवा बार कौन्सिल सदस्य अॅड. संग्राम देसाई, जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षा अॅड. परिमल नाईक हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष मोहम्मद फकीह यांनी केले आहे.

You cannot copy content of this page