जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्यावतीने कळसुलीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…

⚡कणकवली ता.२७-: कळसुली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ तसेच कळसुली दिंडवणे प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक २ येथील विद्यार्थ्यांना जीवन प्रबोधिनी ट्रस्ट यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी आणि आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान नर यांच्या संकल्पनेतून गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कला, क्रीडा, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ट्रस्टतर्फे वेळोवेळी साहित्य वाटप, शैक्षणिक मदत व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात.

या कार्यक्रमाला ट्रस्टचे कार्यकर्ते सूर्यकांत पालव, कळसुलीचे माजी उपसरपंच गजानन मठकर, ग्रामपंचायत सदस्य मानसी दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रीती पारधीये, कळसुली क्रमांक १ च्या मुख्याध्यापिका संगीता सावंत, कळसुली दिंडवणे शाळेचे मुख्याध्यापक दिनेश सुद्रिक, शिक्षिका राधिका कवडे, रवींद्र मोरे, रविकांत दळवी, लक्ष्मण घाडीगांवकर, संतोष सुतार, रुझाय फर्नांडिस, काका दळवी, महादेव मठकर, विराज गोसावी, युवराज आरोलकर, अंगणवाडी सेविका वृषाली बागवे, प्रमिला दळवी यांच्यासह दोन्ही शाळांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, स्केचपेन बॉक्स, ब्लँकेट आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थितांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवे बळ व प्रोत्साहन मिळते, असे मत व्यक्त केले.

You cannot copy content of this page