मालवण नगरपालिकेला जिल्हा नगरोत्थान निधीतून १ कोटी मंजूर…

खा. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग १ ते १० मधील १४ विकासकामांना मंजुरी..

⚡मालवण ता.२७-:
खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रयत्नाने जिल्हा नगरोत्थान निधीतून मालवण नगरपालिकेला १ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नगरपालिका निवडणुकीत जनतेने केलेल्या मागणीनुसार या निधीतून शहरातील १ ते १० प्रभागातील कामे मंजूर करण्यात आली असून यात विविध १४ कामांचा समावेश असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिली आहे. हा निधी मंजूर झाल्याबद्दल त्यांनी खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्यासह जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत.

मालवण येथील आमदार निलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयात आज दुपारी मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी पत्रकार परिषद घेतली . यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, महेश कांदळगावकर, मेघा गावकर, शर्वरी पाटकर आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर म्हणाल्या, नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या निमित्ताने आम्ही शहरात फिरत असताना विविध प्रभागातील नागरिकांनी काही विकास कामांची मागणी केली होती. ही कामे आम्ही आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना सुचविली होती. या कामांना जिल्हा नगरोत्थान निधीमधून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाला या निधीतून विविध कामे देण्यात आली आहेत. यात आडवण रोड चंद्रकांत चव्हाण यांच्या घरासमोर संरक्षक भिंत बांधकाम करणे, वायरी प्रसाद मिठबावकर नाका ते मिठबावकर घरापर्यंत जाणाऱ्या पायवाटेवर पेव्हर ब्लॉक बसविणे, नामदेव आचरेकर दांडी घरापासून महादेव मार्गापर्यंत आर. सी. सी गटार बांधकाम करणे, विलास केरकर घर गवंडीवाडा ते शर्वरी पाटकर घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता बनविणे, मालवण मेढा रामगल्ली येथील रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे, मेढा मालवण चंदू सरकारे घरासमोरील रस्ता ते शंकर मंदिर प्रदक्षिणा मार्गावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, मालवण न. पा. हद्दीतील कोतेवाठा पेधील अविनाश आंबरेकर घर ते साई मयेकर घरापर्यंत आर सी सी गटार बांधणे, विनायक रेडकर घर रोझरी चर्च शेजारी ते मंगल कांबळी घरापर्यंत आर. सी. सी. लाद्या बसविणे, राजन सरमळकर घर ते पिंपळपार रस्त्यामध्ये सामंत घर ते लोके घर आर. सी. सी. गटार बांधकाम करणे, मालवण न. पा. हद्दीतील डॉ दिघे घर ते रांगोळी मठा पर्यंत आर सी सी गटार बांधकाम करणे, मालवण न. पा. हद्दीतील आडारी रेवतळे मुख्य रस्ता ते प्रकाश कोरगावकर घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, धुरीवाडा साळसकर स्मशानभूमी पंपशेड आणि जळावू लाकूड ठेवण्यासाठी शेड बांधणे व अंतर्गत सुविधा पुरविणे, कोचरेकर घर ते राजन सरमळकर घरापासून आरोलकर घरापर्यंत आर. सी. सी. गटार बांधकाम करणे, धुरीवाडा दिलीप हडकर दुकान ते बोर्डिंग ग्राउंड कॉर्नर ते वैभव मयेकर घरापर्यंत आर. सी. सी. गटार बांधकाम करणे ह्या १४ कामांचा समावेश आहे.

मालवण शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी नगरपालिका निवडणुकीत जनतेला दिलेले विकासाचे प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आमचे प्रयत्न राहणार आहेत. या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी विकासाची अष्टसूत्री जनतेसमोर मांडली आहे. ती पूर्णत्वास नेण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून यासाठी आवश्यक निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

मामा वरेरकर नाट्यगृहाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न

मामा वरेरकर नाट्यगृहात आमने सामने नाट्यप्रयोगावेळी कलाकारांनी व्यक्त केलेली नाराजी याची गंभीर दखल नगरपालिकेने घेतली आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकांनी या नाट्यगृहाची पाहणी करून येथील दुरावस्थेची माहिती आमदार निलेश राणे यांच्यासह मुख्याधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी देखील नाट्यगृहाची पाहणी करत काही सूचना केल्या आहेत.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नाट्यगृह दुरुस्तीसाठी आवश्यक निधी देणार असल्याचे म्हटले असून त्यातून नाट्यगृहाच्या किरकोळ दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यानंतर शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून उर्वरित कामे पूर्ण होणार असून त्यानंतरच नाट्यगृह नाटकांसाठी खुले केले जाईल, असे नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी सांगून नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्या म्हणाल्या.

You cannot copy content of this page