साहित्य क्षेत्रात वि वा शिरवाडकर यांचे स्थान ध्रुवताऱ्या यासारखे अढळ…

भंडारी हायस्कुल मधील मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात तहसीलदार लव्हे यांचे प्रतिपादन..

⚡मालवण ता.२७-:
वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांना १९८७ साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाची पावतीच आहे. समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांबद्दल ते संवेदनशील होते. त्यांच्या साहित्यातून समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे मूल्य अधोरेखित झाल्याने साहित्य क्षेत्रात त्यांचे स्थान ध्रुवताऱ्या यासारखे अढळ आहे असे प्रतिपादन मालवणचे तहसीलदार श्री गणेश लव्हे यांनी येथे बोलताना केले

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे आज मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे जॉईंट ट्रेझर अभिमन्यू कवठणकर, यांनी भूषविले होते यावेळी व्यासपीठावर संस्थेची ऑनरारी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर, केळबाई देवी मंदिर ट्रस्टचे शरद मयेकर मुख्याध्यापक एच बी तिवले, पर्यवेक्षक आर डी बनसोडे सहाय्यक शिक्षिका सौ संजना सारंग, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते

प्रारंभी मुख्याध्यापक तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सौ संजना सारंग यांनी प्रास्ताविक केले सहाय्यक शिक्षिका सरोज बांदेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला

यावेळी बोलताना तहसीलदार श्री गणेश लव्हे यांनी अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी छोट्या मोठ्या स्पर्धामध्ये भाग घेतला पाहिजे, स्पर्धेतील सहभागामुळे आपल्यातील अंगभूत कलागुणांना चालना मिळते, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धात्मक कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे, ते काम भंडारी हायस्कुल करत आहे,
या स्पर्धेच्या निमित्ताने बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप ही त्यांना नियमित प्रेरणा देणारी ठरेल आणि भविष्यात ते उज्वल यश मिळवितील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री अभिमन्यू कवठणकर यांनी भंडारी हायस्कूलच्या उपक्रमाचे कौतुक करीत भंडारी हायस्कूलच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी तीन लाख तीन हजार रुपये देणगी जाहीर केली यावेळी श्री लव्हे यांचा अभिमन्यू कवठणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या हस्ताक्षर आणि प्रश्नमंजुषा कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी तर आर डी बनसोडे यांनी आभार प्रदर्शन केले

You cannot copy content of this page