Headlines

पाट हायस्कूलमध्ये वृक्षदिंडी आणि वृक्ष लागवडीतून जनजागृती…

⚡कुडाळ ता.०५-: पाट हायस्कूलमध्ये हरित सेना आणि इको क्लब मार्फत विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वृक्षदिंडी आणि वृक्ष लागवडीचे महत्त्व मुलांना समजावून सांगण्यात आले.
या उपक्रमासाठी श्रेया परब आणि नम्रता कोळी वनरक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापक सयाजी बोंदर पर्यवेक्षिका अंकिता मोडक उपक्रम प्रमुख संदीप साळसकर रमेश ठाकूर उपस्थित होते.
यानिमित्ताने वृक्षारोपण वृक्षदिंडी पाट गावा मध्ये काढण्यात आली. यावेळी एक पेड मा के नाम या मोहिमेबद्दलही माहिती देण्यात आली. परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवडीसाठी पालकांपर्यंत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. विद्यार्थ्यांना वृक्षाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे तयार केलेले सिडबॉलचेही वाटप करण्यात आले.
एस के पाटील शिक्षण प्रसारक पंचक्रोशी पाट तर्फे शाळेच्या परिसरात विविध झाडांची लागवड यापूर्वीही केलेली आहे. आजच्या उपक्रमातून चंदन, बहावा, आपटा अशा झाडांचीही परिसरात लागवड करण्यात आली. दरवर्षी वृक्ष रोपणाच्या उपक्रमामुळे पाट हायस्कूलचा परिसर हिरवागार बनलेला आहे.

You cannot copy content of this page