Headlines

उभादांडा केपादेवी शाळेला जि.प. सदस्य संजय गावडे यांच्याकडून वॉटर प्युरिफायर व शालेय साहित्य

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील
उभादांडा केपादेवी जिल्हा परिषद शाळेला उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे यांनी वॉटर प्युरिफायर प्रदान करून तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांना शुद्ध व आरोग्यदायी पाणी मिळावे या उद्देशाने देण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन फीत कापून केपादेवी देवस्थानचे मानकरी विष्णू उर्फ बाळू गिरप यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे होते. शाळेचे मुख्याध्यापक शंकर जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संजय गावडे यांच्या आश्वासन पूर्तीबाबत शिक्षक व पालक संघाने यावेळी समाधान व्यक्त केले. यावेळी पदवीधर शिक्षक सचिन ठाकरे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा पूनम गिरप, पदवीधर शिक्षक रेश्मा वरस्कर, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष भानुदास कांबळी, उपाध्यक्ष कृष्णा तोरसकर, उभादांडा ठाकरे शिवसेना विभागप्रमुख सुजित चमणकर, तालुका महिला संघटिका साक्षी चमणकर, शाखाप्रमुख अभिमन्यू भुते, आनंद कुर्ले , ग्रामपंचायत सदस्य नम्रता कुर्ले , युवासेना पदाधिकारी वैभव फटजी, पालक शशांक तुळसकर, नारायण, गितेश गिरप, जिया गिरप, मीनाक्षी शिंदे, राजलक्ष्मी वेंगुर्लेकर यांच्यासह पोलीस पाटील अनुप नार्वेकर, राकेश सारंग, मनस्वी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.या
कार्यक्रमात जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावणे मध्ये द्वितीय क्रमांकप्राप्त सावरी तुकाराम पुरस्कर आणि शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणारी ग्रीष्मा आंदुर्लेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी
शाळेला यापुढेही लागणाऱ्या
सुविधाबाबत सहकार्य राहील.तसेच काही विद्यार्थ्यांनी केलेली शालेय साहित्याची मागणी देखील लवकरच पूर्ण करू असे यावेळी संजय गावडे यांनी आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शंकर जाधव यांनी व पदवीधर शिक्षक सचिन ठाकरे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page