Headlines

उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे यांच्यामार्फत आसोलीतील 5 शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡वेंगुर्ला ता.०५-: मराठी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी उभादांडा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांच्या हस्ते आसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १, श्री देव नारायण मंदिर शाळा, फणसखोल, सक्राळ, जोसोली प्राथमिक शाळा आणि बापुलिवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर आणि लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. अंगणवाडीतील मुलांनाही पेन व वह्या वाटप करण्यात आले. यावेळी आसोली माजी उपसरपंच विकी केरकर, शाखाप्रमुख मदन गावडे, ज्येष्ठ नागरिक विनायक धुरी, प्रमोद धुरी, बाळकृष्ण किनळेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष परिधी किनळेकर, उपाध्यक्ष आरती सांगळे, सदस्य सुप्रिया गुरव, प्रितेश किनळेकर, सामाजिक कार्यकर्ते नंदा घाडी, भूषण धुरी, अण्णा पाटलेकर, बाळकृष्ण, युवासेना पदाधिकारी
वैभव फटजी, शिक्षक पाटील,
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ श्री देवनारायण मंदिरच्या मुख्याध्यापिका वैभवी राय शिरोडकर, पदवीधर शिक्षक पवार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page