⚡मालवण ता.१०-:
आचरा पिरावाडी येथील समिधा गणपत चौगुले यांच्या घरात पाहुणी म्हणून आलेल्या ऋतुजा करुणाघन जोशी या १९ वर्षीय नवविवाहितेने चौगुले यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे अडीज लाख रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी ऋतुजा जोशी हिच्यासह तिचा पती साहिल शकील आजरेकर (वय २४, रा. मालवण) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. दरम्यान, दोन्ही संशयित आरोपींना बुधवारी मालवण न्यायालयात हजर केले असता संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर अधिक तपास करत आहेत.
आचरा चोरी प्रकरणातील दोन संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी…
