⚡मालवण ता.१०-:
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षांपासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हे पुरस्कार अभियान राबवीण्यात येत आहे. या अभियानात मालवण तालुका वरचढ ठरावा यासाठी मालवण तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी ठीक 10.30 वाजता श्री समर्थ मंगल कार्यालय सभागृह, कोळंब येथे घेण्यात येणार आहे.
या तालुका स्तरीय कार्यशाळेसाठी मालवणचे आमदार श्री. निलेश राणे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
अभियान कालावधीत सर्व मुद्दावर कार्यवाही करणेत येणार असून दैनंदिन अहवाल संबंधीत App वर पाठविणेत येणार आहेत . सदसचे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सर्व अभियाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची प्रभावी अमंलबजावणी करणेत येणार आहे . या अभियानामध्ये सुशासन , सक्षम पंचायत , जलसमृद्ध व हरीतगांव , योजनांचे अभिसरण , गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण , उपजिविका विकास , सामाजिक न्याय , लोकसहभाग व श्रमदान इत्यादी या अभियानाचे मुख्य घटक आहेत .गटातील सर्व ७२ ग्रामपंचायतीं सहभागी असुन सदरचे अभियान प्रभावीपणे राबविणेत येणार आहे व त्या बाबतचे संपुर्ण नियोजन करणेत आलेले असून त्या नुसार अमंलबजावणी करणेत येणार आहे .तरी या कार्यशाळेस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी केले आहे