⚡सावंतवाडी ता.१०-: मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडशीट भेट स्वरूपात देण्यात आल्या. वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवाळे, रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य देव्या सूर्याजी यांच्याकडे त्या सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी जीवनरक्षा प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसूरकर, प्रथमेश प्रभू तसेच सावंतवाडी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष अब्दुलरहेमान करोल, उपाध्यक्ष रफिक मेमन, सेक्रेटरी चाँदमैनुद्दिन करोल, जॉ. सेक्रेटरी महंमदअरीफ करोल, खजिनदार महमंदशफी खान, सदस्य महमंद समेजा, सलिम अगबाणी, जमिल शेख, याकुब पडवेकर, अनिस बिजली, बशिर पडवेकर इलियास आगा, शैबाज आगा आदी उपस्थित होते. डॉ ऐवाळे व रुग्ण कल्याण समितीकडून यासाठी संस्थेचे आभार मानण्यात आले.