⚡सावंतवाडी ता.२७-: जि.प. प्राथमिक शाळा तळवणे नंबर १ येथे “मराठी भाषा गौरव दिन” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.विष्णु वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज ) यांच्या जयंती निमित्त आज तळवणे प्राथमिक शाळेत ” मराठी भाषा गौरव दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिक्षक बापूशेट कोरगावकर यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली.तर मनिषा राऊळ नाटेकर यांनी कुसमाग्रज यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांना माहिती ,मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी मराठी भाषेबाबत उत्तम अशी नाटिका सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळीं शाळेच्या वतीने प्रश्न मंजुषा,नाटिका असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक युवराज गोसावी, बापूशेट कोरगावकर ,शिवाजी कवडे,मनिषा राऊळ नाटेकर ,मदन मुरकर,विद्यार्थी उपस्थित होते.
तळवणे शाळेत मराठी भाषा गौरव दिन” विविध उपक्रमांनी साजरा…
