मुंबईतील निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट: विकास कामांवर झाली चर्चा..
सावंतवाडी ता. पालकमंत्री नितेश राणे यांची आज मुंबई येथे माजी मंत्री प्रवीण भोसले यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘सुवर्ण गढ’ येथे भेट घेतली.
या भेटीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील दोन अत्यावश्यक विकासकामांबाबतचे निवेदन प्रवीण भोसले यांनी मंत्री महोदयांना सादर केले. संबंधित कामांवर लवकरात लवकर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.यावेळी प्रवीण भोसले यांनी सांगितले की, सिंधुदुर्गच्या विकासासाठी पालकमंत्री सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या या प्रयत्नांना आपले पूर्ण सहकार्य राहील. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.या चर्चेमुळे जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
