सिंधुदुर्ग ओबीसी महासंघाची आज तातडीची सभा…

ओबीसी महायल्गार मेळावाबाबत चर्चा होणार..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाची तातडीची सभा आज बुधवार दिनांक 10/09/25 रोजी सायं ठीक 4.30 वाजता मराठा हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
यावेळी खालील विषयांवर चर्चा करून एकमताने निर्णय घेतले जाणार आहेत.
1) ओबीसींचा महायल्गार मेळावाबाबत चर्चा करणे.
2) संभाव्य नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी या सर्व निवडणुकीबाबत विचारविनिमय करणे.
3) संघटन बांधणी मजबूत होण्यासाठी तालुकानिहाय दौरे आयोजित करून तालुका शाखा गठित करणे..
4) जिल्हा संघटनेची आवश्यकतेनुसार पुनर्रचना/पुनर्बांधणी करणे.
5) जिल्हास्तरीय सभासद नोंदणी अभियान रुपरेषा ठरविणे.

You cannot copy content of this page