⚡बांदा ता.१०-:
शेतकरी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी व त्यांना काजू बोर्ड कार्यकारिणीत प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी गुरुवार दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता बांदा गडगेवाडी येथील दूध संस्था कार्यालयात शेतकरी सभा आयोजित करण्यात आली आहे.
अलीकडेच शासनाने जाहीर केलेल्या काजू बोर्ड कार्यकारिणीत केवळ राजकीय नेते व पुढाऱ्यांना स्थान मिळाले असून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकरी प्रतिनिधींना कार्यकारिणीत स्थान मिळावे, यासाठी काजू बोर्ड संचालक डॉ. परशराम पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी ठेवण्यात येणार आहे.
याबाबत शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आले असून, प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःसोबत किमान तीन ते चार शेतकरी घेऊन सभेला उपस्थित राहावे असे सांगण्यात आले आहे. अन्यथा भविष्यात केवळ राजकीय नेत्यांचे निर्णय आपल्यावर लादले जातील, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.