सावंतवाडी तालुका जेसीबी मालक संघटनेची बैठक संपन्न…!

⚡बांदा ता.१०-: सावंतवाडी तालुका जेसीबी मालक संघटनेची बैठक दिनांक ९ सप्टेंबर रोजी देवांगी सभागृह, इन्सुली येथे पार पडली. या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष उमेश पेडणेकर अध्यक्षस्थानी होते.

या बैठकीत मुख्यतः दोन विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली –
1. सन 2025-26 साठी दरपत्रक निश्चित करणे
2. परप्रांतीय जेसीबी मालकांच्या अतिक्रमणाविरोधात भूमिका ठरवणे

ठरविण्यात आलेले दरपत्रक (2025-26)
• बेसिक प्रति तास दर – 1400 रुपये
• रनिंग – किमान 700 रुपये
• ब्रेकर – 1800 रुपये प्रति तास
• मशीन मासिक भाडे – 1,30,000 रुपये (240 तास) + चालक भत्ता (जेवण व नाश्ता समाविष्ट)
• ट्रिपवर माती भरणे – 700 रुपये प्रति डंपर
• विहीर खोदणे – 1600 रुपये प्रति तास

हा प्रस्ताव अध्यक्ष उमेश पेडणेकर यांनी मांडला असून त्याला सुदन (सुधा) कवठणकर यांनी अनुमोदन दिले.

परप्रांतीय अतिक्रमणाविरोधात ठराव

तालुक्यातील स्थानिक युवकांना रोजगाराचे प्राधान्य देण्यासाठी परप्रांतीय जेसीबी मालकांना सावंतवाडी तालुक्यात काम करण्यास प्रतिबंध घालावा, असा ठराव सत्यविजय पांढरे यांनी मांडला. यास आशिष कदम यांनी अनुमोदन दिले.

बैठकीत निर्णय घेण्यात आला की तालुक्यातील प्रत्येक जेसीबी मशीनवर दरपत्रकाचे स्टिकर लावून त्याप्रमाणेच काम केले जाईल.

बैठकीस उपस्थित सदस्य

उमेश पेडणेकर, सुदन कवठणकर, नितीन सावंत, दिगंबर कवठणकर, संजय गावकर, मंदार कल्याणकर, मिलिंद नाईक, कृष्णा गवस, महेंद्र पालव, सागर देसाई, आशिष झांटये, नंदू नाईक, प्रकाश राऊत, राजन म्हापसेकर, हितेश म्हापसेकर, अशोक शिरसाट, प्रदीप मुळीक, विकास निकम, सत्यविजय पांढरे, आशिष कदम, चिन्मय कदम, प्रवीण जोशी, प्रकाश माळकर, केतन वेंगुर्लेकर, महेश धुरी आदी जेसीबी मालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page