कुडाळ न्यायालय आणि तालुका विधी सेवा समितीचे आयोजन..
कुडाळ : कायदेविषयक जनजागृती शिबीर कार्यक्रमांतर्गत कुडाळ न्यायालय आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळ येथे आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आणि POCSO Act या विषयावर मान्यवर विधिज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम कुडाळ हायस्कूल जूनियर कॉलेजचे सहप्राचार्य श्री साळवी सर यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर संपन्न झाले. यावेळी वकील अमित कुंटे यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वकील संजय रानडे यांनी POCSO Act या विषयावर मार्गदर्शन केले. सह प्राचार्य श्री साळवी सर यांनी अध्यक्षीय भाषणात या शिबिरात प्राप्त झालेल्या माहितीचे व कायद्यांचे आपल्या शैक्षणिक क्षेत्रात वापर करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिवाणी न्यायालय कुडाळचे वरिष्ठ लिपिक आर. टी . आरेकर यांनी केले. या कार्यक्रमात ७० ते ७५ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन दिवाणी न्यायालयातील कर्मचारी आर टी आरेकर वरिष्ठ लिपिक व चपराशी श्री करंगुटकर यांनी केले.