Headlines

सावंतवाडी पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर…

सावंतवाडी: सावंतवाडी पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रांताधिकारी हेमंत निकम व तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोडतीमध्ये विविध प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. सोडतीनुसार कलंबिस्त, आंबोली, मळगाव, माजगाव, न्हावेली व इन्सुली तसेच सातार्डा हे प्रभाग सर्वसाधारण खुल्या गटासाठी ठेवण्यात आले आहेत. माडखोल, कारिवडे, चराठे, मळेवाड, बांदा व तांबोळी हे…

Read Full News

भाजप युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे होणार साजरा…

केतन आजगावकर: मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदानाचे केला संकल्प.. ⚡सावंतवाडी ता.१३-: भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम धूमधडाक्यात नाही , तर सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याबाबतची माहिती भाजप सोशल मीडिया संयोजक केतन आजगावकर यांनी दिली. दरम्यान, मराठवाड्यातील पुराकाळातील त्रस्त नागरिकांसाठी मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधींसाठी योगदान देण्याचा…

Read Full News

गांजा विक्री केल्याप्रकरणी सावंतवाडीत एक जण ताब्यात…

⚡सावंतवाडी ता.१२-: गांजा विक्री केल्याप्रकरणी सावंतवाडी येथे एकाला आज सावंतवाडी पोलिसांनी मोठ्या सिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई आज करण्यात आली. जावेद शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या घराच्या अंगणात गांजा विक्रीच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून ३० ते ४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला…

Read Full News

स्वच्छता दूतांकडून कामाक्षी इंटरप्राईजेसचे शैलेश पै यांचा वाढदिवस केला उत्साहात साजरा…

स्वच्छता दूतांनी कामाक्षी इंटरप्रायझेसचे शैलेश पै यांचा वाढदिवस केला उत्साहात साजरा… ⚡सावंतवाडी ता.१२-: गोरगरिबांचा आधार, सर्वसामान्यांच्या जवळ जाणारे, आणि सौजन्यशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सावंतवाडीतील कामाक्षी इंटरप्राईजेसचे मालक शैलेश पै यांचा वाढदिवस आज शहरातील कंत्राटी स्वच्छता दूतांनी साजरा केला. नेहमीच समाजातील प्रत्येक घटकांशी मनमोकळेपणे संवाद साधणारे, त्यांचे सुख-दुःख जाणून घेणारे आणि हसतमुखाने वागणारे शैलेश पै…

Read Full News

विकास दळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश…!

⚡मालवण ता.१२-:मालवण कुणकावळे गावातील उबाठा पक्षाचे शाखा प्रमुख विकास दळवी यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विकास दळवी यांची पत्नी श्रेया दळवी या कुणकावळे ग्रामपंचायत सदस्य आहेत. कुणकावळे गावच्या विकासासाठी पाठीशी असल्याचा विश्वास प्रदेश अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला. ग्रामपंचायत सदस्य सुरेश राणे हे ही भाजपा…

Read Full News

कोकण रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीस…

कणकवलीतील शिवाजीनगर येथील घटना.. कणकवली : शहरातील शिवाजीनगर परिसरात इमारतीखाली उभी करून ठेवलेली टीव्हीएस कंपनीची एंटॉर्क दुचाकी चोरीस गेल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेतील कर्मचारी अनिल तुकाराम तांबे (वय ५६) हे माऊली दर्शन अपार्टमेंट, शिवाजीनगर, कणकवली येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सायंकाळी त्यांनी आपली दुचाकी इमारतीखाली पार्क केली…

Read Full News

राज्यस्तरीय भजन स्पर्धेत कोकणाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान कणकवली कामगार कल्याण संघाला…

महाड द्वितीय तर पोफळी तृतीय; वैयक्तिक बक्षीसातही कणकवलीचे वर्चस्व.. कणकवली : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ठाणे विभाग गट कार्यालय चिपळूण आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमित्त कामगार कल्याण केंद्र कणकवली मार्फत नगर वाचनालय हॉल कणकवली येथे गटस्तरीय कामगार पुरुष भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजेता ठरला कामगार कल्याण कणकवली हा संघ .या…

Read Full News

वेत्ये गावात फेरफटका मारणारी मगर अखेर पकडली…

⚡सावंतवाडी ता.१२-: गेल्या काही दिवसांपासून वेत्ये गावातील छोट्या होळामध्ये फेरफटका मारणारी मगर अखेर आज ग्रामस्थ आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नातून पकडण्यात आली. या घटनेमुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून गावातील नागरिकांना होळ्याजवळ मगर वावरण्याचे लक्षात आले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी त्वरित वनविभागाला माहिती दिली. आज सकाळी पुन्हा मगर दिसून आल्यानंतर वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली…

Read Full News

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सहकार मंत्र्यांचा काँग्रेसकडून तीव्र निषेध…

काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी; इर्शाद शेख.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या निर्लज्ज, असंवेदनशील आणि अमानुष वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे.शेतकऱ्यांना “कर्जमाफीचा नाद लागलाय” आणि “आम्हाला निवडून यायचे असते म्हणून आम्ही आश्वासन देतो, पण काय मागणी करायची हे शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे”…

Read Full News

मडुऱ्यात हत्तीने घेतले चव्हाट्याचे दर्शन; ग्रामस्थांत आश्चर्याचा विषय…

⚡बांदा ता.१२-:मडुरा परबवाडी येथे शनिवारी रात्री ओमकार हत्तीने थेट श्री देव चव्हाटा मंदिरात जाऊन देवदर्शन घेतल्याची अनोखी घटना घडली. प्रथम मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचून तो सुमारे 10 मीटर अंतरावर थांबला. मात्र ग्रामस्थांनी त्याला हाक दिल्याने पुन्हा माघारी वळला आणि काही क्षणांत पुन्हा मंदिरात गेला. या दृश्याने ग्रामस्थ थक्क झाले.या घटनेने ग्रामस्थांत भक्तिभाव आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण…

Read Full News

You cannot copy content of this page