केतन आजगावकर: मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदानाचे केला संकल्प..
⚡सावंतवाडी ता.१३-: भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम धूमधडाक्यात नाही , तर सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याबाबतची माहिती भाजप सोशल मीडिया संयोजक केतन आजगावकर यांनी दिली.
दरम्यान, मराठवाड्यातील पुराकाळातील त्रस्त नागरिकांसाठी मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधींसाठी योगदान देण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे. आरोग्यदूत म्हणून सेवाकार्यातून सावंतवाडीतील जनतेला लाभ मिळावा, या उद्देशाने आरोग्य तपासणी आणि आरोग्यविषयक विविध उपक्रम उभारण्याची संकल्पना त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
