⚡सावंतवाडी ता.१२-: गांजा विक्री केल्याप्रकरणी सावंतवाडी येथे एकाला आज सावंतवाडी पोलिसांनी मोठ्या सिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई आज करण्यात आली. जावेद शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या घराच्या अंगणात गांजा विक्रीच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून ३० ते ४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
गांजा विक्री केल्याप्रकरणी सावंतवाडीत एक जण ताब्यात…
