स्वच्छता दूतांकडून कामाक्षी इंटरप्राईजेसचे शैलेश पै यांचा वाढदिवस केला उत्साहात साजरा…

स्वच्छता दूतांनी कामाक्षी इंटरप्रायझेसचे शैलेश पै यांचा वाढदिवस केला उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१२-: गोरगरिबांचा आधार, सर्वसामान्यांच्या जवळ जाणारे, आणि सौजन्यशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सावंतवाडीतील कामाक्षी इंटरप्राईजेसचे मालक शैलेश पै यांचा वाढदिवस आज शहरातील कंत्राटी स्वच्छता दूतांनी साजरा केला.

नेहमीच समाजातील प्रत्येक घटकांशी मनमोकळेपणे संवाद साधणारे, त्यांचे सुख-दुःख जाणून घेणारे आणि हसतमुखाने वागणारे शैलेश पै यांच्या घरी स्वच्छता दूतांनी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ अर्पण केला आणि त्यांच्या दीर्घायुष्य व यशासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बाबू बरागडे यांच्यासह अनेक स्वच्छता दूत उपस्थित होते. शैलेश पै यांनी या अनपेक्षित शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि शहराच्या स्वच्छतेसाठी कार्यरत प्रत्येक स्वच्छता दूतांचे मनापासून कौतुक केले.

You cannot copy content of this page