आ. दिपक केसरकर ; 129 वाड्यांसाठी 3 कोटी 66 लाख रुपयांचा पाणीटंचाई आराखडा सादर

वेंगुर्ला
सन 2026-27 मधील पाणीटंचाई कृती आराखडा व ट्रिगर 1 दुष्काळाबाबत आढावा बैठक सोमवारी (19 ऑक्टोबर ) सायंकाळी वेंगुर्ला नगरपरिषद स्वामी विवेकानंद सभागृह येथे आ. दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील 129 वाड्यांसाठी 3 कोटी 66 लाख रुपयांचा पाणीटंचाई आराखडा सादर करण्यात आला.यात अन्य विविध कामे ऍड होणार असुन यात अधिकची वाढ करण्यात येणार असून 2 दिवसात वेळीच पाणीटंचाई आराखडा वरिष्ठ स्तरावर सादर करण्याचे आदेश आ. दिपक केसरकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस प्रांताधिकारी
वीरसिंग वसावे, वेंगुर्ला
तहसीलदार ओंकार ओतारी, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पं. स. सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, जि. प. सदस्य सुजाता पडवळ, संजय गावडे, पं.स. सदस्य उपस्थित होते.
तालुक्यात ट्रिगर 1 दुष्काळ जाहीर झाला असून पुढील काळात पाणीटंचाई शक्यताच्या अनुषंगाने सर्वांनी तत्परतेने कार्य करण्याचे आदेश यावेळी आ.केसरकर यांनी दिले.
