सिंधुदुर्गच्या परिवहन क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल:चाचणी प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक होणार..

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्गनगरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मान्यताप्राप्त वाहन चालक चाचणी मार्गाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ बुधवारी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या चाचणी मार्गामुळे वाहनचालकांच्या चाचण्या अधिक सुव्यवस्थित, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने घेण्यास मदत होणार आहे. वाहन चालक चाचणी प्रक्रियेला अधिक शिस्तबद्ध स्वरूप देण्यासह जिल्ह्यातील परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्ह्यातील वाहन चालक चाचणी प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी या चाचणी मार्गाचा उपयोग होणार आहे. परिवहन क्षेत्रातील सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार आहे.
या भूमिपूजन समारंभाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे विजय काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
