सावंतवाडी पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर…

सावंतवाडी: सावंतवाडी पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रांताधिकारी हेमंत निकम व तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोडतीमध्ये विविध प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.

सोडतीनुसार कलंबिस्त, आंबोली, मळगाव, माजगाव, न्हावेली व इन्सुली तसेच सातार्डा हे प्रभाग सर्वसाधारण खुल्या गटासाठी ठेवण्यात आले आहेत.

माडखोल, कारिवडे, चराठे, मळेवाड, बांदा व तांबोळी हे सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित आहेत.

कोलगाव व आरोंदा हे इतर मागास प्रवर्ग (म.प्र.) महिला गटासाठी, तर विलवडे आणि शेर्ले हे इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तळवडे हा प्रभाग अनुसूचित जाती महिला गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.या सोडतीमध्ये तनुषी जाधव आणि भक्ती मुळीक यांनी चिठ्ठ्या काढल्या.

संपूर्ण कार्यक्रम शांततेत व पारदर्शक पद्धतीने घेण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page