सात जागा महिलांसाठी: जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षण सोडत..
ओरोस ता १३
भविष्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेल्या आरक्षण सोडतीत पोंभुर्ले, कासारडे, नेरुळ देऊळवाडा, खारेपाटण, लोरे, कुणकेश्वर, मनेरी, घावनळे, कलमठ, मळेवाड, माणगाव, फोंडा, माडखोल हे तेरा मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. यातील पोंभुर्ले, खारेपाटण, लोरे, मनेरी, कलमठ, मळेवाड, माडखोल हे सात मतदारसंघ या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव तर शिरगाव हा मतदारसंघ या प्रवर्गासाठी खुला राहिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षणाची सोडत सुरू आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या आरक्षण सोडतील सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
