Headlines

सिंधुदुर्ग महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

४ विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण येथील स. का. पाटील पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात करियर गायडन्स अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात एकूण २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी पात्रता व मुलाखतींच्या आधारे ४ विद्यार्थ्यांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली.

या मेळाव्यात विविध आस्थापनांमधील तब्बल १२५ रिक्त पदांसाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात ‘ग्रो बिग’, ‘श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘रोनक एंटरप्रायजेस’ या तीन प्रमुख कंपन्यांनी सहभाग नोंदवून आपल्या आस्थापनांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
यावेळी कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री विनायक व्हील्सकडून मयूर पाताडे, रोनक एंटरप्रायजेसकडून माधव काजरेकर आणि ग्रो बिग कंपनीच्या वतीने विनायक जाधव उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. उज्वला सामंत, डॉ. बेळेकर, प्रा. सावंत तसेच करियर गायडन्स अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक श्री. संग्रामसिंह पवार उपस्थित होते. महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध झाल्याबद्दल उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page