जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या खेळाडूंची निवड; भाजप व नगरपरिषदेच्यावतीने शुभेच्छा

सावंतवाडी : जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ, सावंतवाडीच्या कबड्डी खेळाडूंची सिंधुदुर्ग फेडरेशनच्या अंडर-२० संघात निवड झाली असून हा संघ पालघर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील कबड्डी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेवक सुधीर आडिवडेकर, भारतीय राष्ट्रीय खेळाडू सागर बांदेकर, विजय जाधव, गणेश जाधव तसेच जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे खेळाडू उपस्थित होते.
सिंधुदुर्ग फेडरेशनच्या अंडर-२० संघातून पालघर येथे खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी व सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने सर्व खेळाडूंना आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देत उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
