Headlines

जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलचे वर्चस्व कायम…

कुडाळ : शालेय जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षे मुले व मुली हॉलीबॉल स्पर्धा दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाट हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या दोन्ही गटात पाट हायस्कूलच्या चारही संघाने विजय संपादन करून पाट हायस्कूलची विजयी परंपरा कायम ठेवली. चारही विजय संघाची निवड आष्टा सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.या स्पर्धेच्या…

Read Full News

कणकवली पं.स. सदस्यपदांचे आरक्षण जाहीर…

कणकवली : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कणकवली पंचायत समिती सदस्य पदांसाठी सोमवारीकणकवली तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये एकूण १६ गणांपैकी ८ गण महिलांसाठी राखीव ठरले आहेत. यापैकी जानवली गण अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव झाला असून, या आरक्षणामुळे अनेकांचे पत्ते कट तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. दरम्यान, कणकवली पंचायत समितीचे…

Read Full News

आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे एसटीच्या प्रलंबित विकास कामांना गती…

कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली. आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे एसटीच्या प्रलंबित विकास कामांना गतीमिळाली आहे.या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रकपद नियुक्ती न झाल्याने डेपोची देखभाल व अपुरा कर्मचारी वर्ग अशा प्रकारचे प्रश्न अनेक…

Read Full News

कुडाळ शहर शिवसेना सचिवपदी विलास वराडकर…

कुडाळ : कुडाळ शहर शिवसेनेच्या सचिवपदी कविलकाटे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास वराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते कविलकाटे येथे नियुक्तीपत्र देण्यात आले.कविलकाटे येथे शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कविलकाटे येथे असणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. या समस्या आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून लवकरच सोडविल्या जातील असे…

Read Full News

तेर्सेबाबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी रस्त्याची आम. निलेश राणेंकडे मागणी…

कुडाळ : तेर्सेबाबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी पर्यंत जाणारा रस्ता करावा, तसेच ब्रिजसाठी आवश्यक असणारा निधी मिळावा असे निवेदन मांडकुलीसह भोयाचे केरवडे, मुळदे येथील ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांना दिले. ही कामे लवकरच मार्गी लागतील असे आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांना सांगितले.या निवेदनात म्हटले आहे, पंचक्रोशीतील मांडकुली केरवडे, तुळसुली, मुळदे या गावांना जोडणाऱ्या तेर्सेबांबर्डे मळावाडी…

Read Full News

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी राजघराण्याची युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले इच्छुक…

युवराज लखमराजे भोसले यांची माहिती: वरिष्ठ नेत्यांशी बोलणी सुरू असल्याच देखील दिली माहिती.. सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने यासाठी राजघराण्याच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले इच्छुक असल्याची घोषणा, संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी केली. महायुतीच्या नेत्यांशी बोलण सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राजवाडा येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युवराज लखमराजे म्हणाले, ३५…

Read Full News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश…

येत्या बुधवारी संपूर्ण शहर होणार खड्डेमुक्त: रवी जाधव यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.१३-:सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून येत्या बुधवारी संपूर्ण सावंतवाडी शहर ‘खड्डेमुक्त’ करण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना दूरध्वनीद्वारे दिली. गेल्या तीन वर्षांपासून सावंतवाडी शहरात आणि परिसरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत होते….

Read Full News

सावंतवाडी मतदारसंघातून तिन्ही तालुक्यात निवडणूका लढण्यासाठी आम्ही तयार आहोत…

अमित सामंत:महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल.. ⚡सावंतवाडी ता.१३-: विधानसभा निवडणुकीनंतर मोठा संघर्ष आम्हाला सोसावा लागला. यानंतर आज आमची बैठक झाली. यात सावंतवाडी मतदारसंघातून तिन्ही तालुक्यात निवडणूका लढण्यासाठी आम्ही तयारीत आहोत. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे उमेदवार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते…

Read Full News

कुडाळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर…

पावशी अनु. जातीसाठी आरक्षित.. कुडाळ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती (निर्वाचक गण) सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत आज तहसिलदार कार्यलयात जाहीर करण्यात आली.कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण ठरविण्याची ही सोडत प्रक्रिया सार्वजनिक उपस्थितीत व पारदर्शक पद्धतीने पार पडली.प्रांत ऐश्वर्या काळूशे यांच्या उपस्थितीत तहसीलदार…

Read Full News

हे तेरा जिल्हा परिषद मतदारसंघ ना. मा. प्र साठी राखीव…

सात जागा महिलांसाठी: जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षण सोडत.. ओरोस ता १३भविष्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेल्या आरक्षण सोडतीत पोंभुर्ले, कासारडे, नेरुळ देऊळवाडा, खारेपाटण, लोरे, कुणकेश्वर, मनेरी, घावनळे, कलमठ, मळेवाड, माणगाव, फोंडा, माडखोल हे तेरा मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. यातील पोंभुर्ले, खारेपाटण, लोरे, मनेरी, कलमठ, मळेवाड, माडखोल हे सात मतदारसंघ…

Read Full News

You cannot copy content of this page