Headlines

सावंतवाडीत ‘मेक ईन कोकण’ अंतर्गत भव्य उद्योग, व्यवसाय व रोजगार महोत्सव १८-१९ ऑक्टोबरला”….

विशाल परब यांच्या वाढदिवसाचा औचित्य: मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१४-: आत्मनिर्भर कोकण या अभियानाअंतर्गत ‘मेक ईन कोकण’ ला चालना देण्यासाठी भव्य “उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव”चे आयोजन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना विशाल परब यांनी आपला वाढदिवस सामाजिक दृष्टीकोनातून साजरा करण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने “मेक ईन कोकण”…

Read Full News

आंबोलीत पोलिसांची मोठी कारवाई; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त…

⚡आंबोली ता.१४-: काल रात्री साडेनऊ वाजता आंबोली पोलिस चेकपोस्टवर वाहने तपासणीदरम्यान इनोव्हा कार क्रमांक MH 02 BD 2917 ही सावंतवाडीहून कोल्हापूरकडे जात असताना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने गाडी न थांबवता पळ काढल्याने पोलिसांनी चौकुळ रस्त्यावर सरकारी वाहनातून पाठलाग केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्ता अडवून इनोव्हा वाहन थांबवण्यात आले.तपासणी दरम्यान वाहनातून गोवा बनावटीची विविध…

Read Full News

ठाकरे सेना व राष्ट्रवादीला धक्का, सायली दुभाषी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश…

सावंतवाडी ता.१४-: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सेनेत घेण्याचा धडाका लावला आहे. शिवसेनेत येणाऱ्यांचे प्रमाण वाढतच दिसत आहे. आज सावंतवाडी शहरातील झिरंगवाडी भागातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास…

Read Full News

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तसावंतवाडीमध्ये १५ व १६ ऑक्टोबरला कार्यक्रम…

सावंतवाडी : भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ व १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सावंतवाडीमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संसदेमध्ये शुभारंभाचा प्रयोग झालेले, भारतीय संविधानावर आधारित पहिले नाटक “राष्ट्रग्रंथ” आणि संविधानावर आधारित संगीतमय कार्यक्रम होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाला…

Read Full News

मालवण बंदर जेटीवर बेंच, लाईट्स व सुसज्ज स्वच्छतागृहाची सोय निर्माण व्हावी – नितेश पेडणेकर…

⚡मालवण ता.१३-:पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मालवण बंदर जेटीवर बेंच, लाईट्स व सुसज्ज स्वच्छता गृह अशा विविध सोयी सुविधांची आवश्यकता असून याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे, अशी मागणी मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते नितेश पेडणेकर यांनी केली आहे. मालवण बंदरात नवीन जेटी उभारण्यात आली असून जुन्या जेटीचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाच्या निमित्ताने दोन्ही…

Read Full News

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलचे यश…

⚡मालवण ता.१३-:ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १४ वर्ष मुली गटात मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडिअम स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले. या संघाची कोल्हापूर विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली असून हा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघात सोनाक्षी शेलटकर, हिमांगी…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयुष्मान भारत व वयवंदना योजना कार्ड उपक्रमाला गती; एका दिवसात ४५०० कार्ड निर्मिती…

सिंधुदुर्गनगरी ता १३पालक सचिव विरेंद्र सिंह यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौर्‍यात त्यांनी आरोग्यविषयक विविध सूचना देण्यात आल्या. त्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात आयुष्मान भारत आणि वयवंदना योजना कार्ड उपक्रमाला गती मिळाली आहे. जिल्ह्यात शनिवारी एका दिवसात तब्बल ४५०० आयुष्मान कार्ड काढण्यात आली. तर आतापर्यंत ४ लाख ६५ हजार १९३ कार्ड काढण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये…

Read Full News

दीपावलीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तू व खाद्यपदार्थ प्रदर्शनाचे उद्घाटन…

⚡सिंधुदुर्गनगरी ता १३-:जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने खास दीवाळी सणानिमित्त आयोजित खाद्य पदार्थ व वस्तुंच्या स्टॉल चे उद्घाटन आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते विविध जि. प.अधिकाऱ्याच्या उपस्तितीत पार पडला . दिवाळी सणा निमित्त आवश्यक खाद्यपदार्थ व वस्तूंच्या विक्रीचे प्रदर्शन जिल्हा परिषद परिसरामध्ये १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य…

Read Full News

मालवण लायन्स क्लबकडून मेहनती महिलांचा सत्कार…

⚡मालवण ता.१३-:ऑक्टोबर सर्व्हिस वीक आणि वर्ल्ड सर्व्हिस डे च्या निमित्ताने लायन्स क्लब मालवणच्या वतीने मेहनती दोन कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. मालवण येथील समीर शेख सर्व्हिसिंग सेंटर मध्ये गाड्या धुण्याचे काम करून आत्मसन्मानाने, स्व:कर्तृत्वाने आणि मेहनतीने जीवन जगणाऱ्या रजिया उमर शेख व तरनूम समीर शेख या सासू- सुनेचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात…

Read Full News

वेंगुर्ल्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण जाहीर…

वेंगुर्लेवेंगुर्ले पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी सदस्य पदांची आरक्षण सोडत आज तहसीलदार कार्यालय येथे जाहीर झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार राजन गवस आदींच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत संपन्न झाली. दरम्यान निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार या आरक्षण सोडत मध्ये जुन्या आरक्षणांचा विचार न केला गेल्याने सर्वच ठिकाणी नवीन आरक्षण जाहीर झाली यामुळे…

Read Full News

You cannot copy content of this page