Headlines

योग शिक्षण देण्याचे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद…

तृप्ती धोडमिसे:जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योगशिक्षक पदविका प्रदान समारंभ;४० पदविकाधारकांना पदविका प्रदान.. कुडाळ : शरीर मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी योग ही आजच्या काळाची गरज बनली आहे. या दृष्टीने योग पदविका, पदव्युत्तर योग पदवी सारख्या पदव्या घेणारे, स्वतःबरोबर पदव्युत्तर इतरांचे आरोग्य सुधारण्यास हातभार लावू शकतात. त्या दृष्टीने जनजागृती व्हावी या उद्देशाने बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून…

Read Full News

गोरगरीब, गरजुंसाठीचा आधारवड ‘राधारंग फाउंडेशन’…

गेली १५ वर्षे सिंधुदुर्गात कार्यरत:रघुनाथ आणि डॉ. अशोक सरनाईक यांनी स्थापन केली संस्था.. कुडाळ : आपले वडील पांडुरंग आणि आई राधाबाई यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्याच नावाने अमेरिकास्थित रघुनाथ आणि डॉ. अशोक सरनाईक या त्यांच्या सुपुत्रांनी सन २०१० मध्ये राधारंग फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. आज हि संस्था सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रात गोरगरीब गरजू लोकांसाठी…

Read Full News

भरधाव ब्रेझा कारची दुचाकीला जोरदार धडक…

सावंतवाडी : भरधाव ब्रेझा कारने समोरुन येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात जुन्या मुंबई गोवा महामार्गावर माजगाव तांबळगोठण येथे दुपारी तीन वाजता घडला. फारूक हेरेकर (वय ५०, रा. माजगाव गरड) असे त्यांचे नाव आहे त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन अधिक उपचाराकरिता गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले.याबाबत अधिक माहीती अशी…

Read Full News

विशाल परब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा…!

⚡सावंतवाडी ता.१५-: भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस महाराष्ट्रातील आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख ५५ हजार ५५५ रूपयांचा धनादेश देत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारला मोठं सहाय्य केलं आहे. विशाल परब यांनी सामाजिक बांधीलकीतून आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने ५ लाख ५५ हजार ५५५…

Read Full News

आचरा हिर्लेवाडी येथे 18आक्टोबर रोजी डबलबारी…

मालवण दि प्रतिनिधीआचरा हिर्लेवाडी येथील समाधीस्थ योगी महाराज श्री लक्ष्मण रावजी हळदणकर उर्फ दादा महाराज यांच्या निवासस्थानी शनिवार 18 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठिक आठ नंतर श्री पडेलकर प्रासादिक भजन मंडळ धालवलीबुवा अखिलेश फाळके विरुद्ध गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ मुंबई बांद्राबुवा गणेश जांभळे यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे तरी भजन रसिकांनी याचा लाभ घेण्याचे…

Read Full News

हातोडा फेक क्रीडाप्रकारात निशांत शिरोडकर याची विभाग स्तरावर निवड…

⚡मालवण ता.१५-:ओरोस येथील क्रीडा संकुलमध्ये क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय हातोडा फेक या क्रीडा प्रकारात मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील कु. निशांत नितीन शिरोडकर याने द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची विभाग स्तरासाठी निवड…

Read Full News

वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय स्वागतार्ह…

संविधानिक हितकारिणी महासंघ करणार पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा नागरी सत्कार करणार:पदाधिकाऱ्यांची माहिती.. कणकवली : जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक असलेली जुनी नावे बदलून महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांशी निगडित असलेली नावे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आहे. त्यामुळे या वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलली जाणार…

Read Full News

एसटी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने कृती समितीकडून कणकवलीत आनंदोत्सव…

एसटी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने कृती समितीकडून कणकवलीत आनंदोत्सव.. कणकवली : एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेऊन राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडण्यात आले. महत्वाच्या मागण्या मान्य झाल्याने आज कणकवली एसटी बसस्थानक येथे कृती समितीचे कामगार प्रतिनिधी व एसटी कामगार यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी…

Read Full News

राष्ट्रीय काँग्रेसच्या मालवण – देवगड तालुका निवडणूक प्रमुखपदी अरविंद मोंडकर…

⚡मालवण ता.१४-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर यांची काँग्रेसच्या मालवण – देवगड तालुका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख व प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी अरविंद मोंडकर यांना दिले आहे. मालवण व देवगड तालुक्यातील…

Read Full News

सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या बांदा येथील नट वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा…

बांदा/प्रतिनिधीसांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या बांदा येथील नट वाचनालयात माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी आणि वाचनालय सदस्यांनी “वाचनाचे महत्त्व” यावर विचार मांडले. वाचनाची सवय ही केवळ ज्ञानवृद्धी…

Read Full News

You cannot copy content of this page