हातोडा फेक क्रीडाप्रकारात निशांत शिरोडकर याची विभाग स्तरावर निवड…

⚡मालवण ता.१५-:
ओरोस येथील क्रीडा संकुलमध्ये क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय हातोडा फेक या क्रीडा प्रकारात मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील कु. निशांत नितीन शिरोडकर याने द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची विभाग स्तरासाठी निवड झाली आहे.

निशांत शिरोडकर याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page