Headlines

बांदा पोलीस ठाण्यात गणरायाच्या दर्शनाला विशाल परब

⚡बांदा ता.०३-: विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या मंगलमय उपस्थितीने बांदा पोलीस ठाण्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी बांदा पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला.

गणरायाच्या दर्शनानंतर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भजन कार्यक्रमातही परब काही काळ सहभागी झाले. भक्तिरसाने न्हालेल्या भजनाच्या सुरांनी आणि गणरायाच्या जयघोषाने पोलीस ठाण्याचा परिसर भक्तिमय झाला होता.
यावेळी बांदा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी विशाल परब यांचे स्वागत केले. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कर्तव्याच्या कठोर जबाबदाऱ्या सांभाळतानाही पोलीस दलाकडून संस्कृती, परंपरा आणि भक्तीभाव जपला जात असल्याचे या गणेशोत्सवातून दिसून आले. विशाल परब यांच्या गणरायाच्या दर्शन व भजनातील सहभागामुळे पोलीस ठाण्यातील गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात आणखी भर पडली.

You cannot copy content of this page