Headlines

कणकवलीत ४ ऑक्टोबर रोजी ‘उत्तरचंद्राची कोजागिरी.’

मालवण दि प्रतिनिधी

कणकवली हळवल येथील निलायम कृष्णकक्ष येथे रविवारी ०४ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ हा सुप्रसिद्ध अभिवाचन अनुभव कार्यक्रम संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना व संहिता लेखन ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांची असून या कार्यक्रमात आजी – वैशाली पंडित, आजोबा – संजय शिंदे, सूत्रधार – अक्षय सातार्डेकर, सहकलाकार – डॉ. सुमेधा नाईक व तालवाद्य – वैभव मांजरेकर या कलाकारांचा सहभाग आहे.

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची निर्मिती व प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वर्गानंद टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सच्या डॉ. वैशाली कोरगांवकर व गीता कामत यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रवेशिका रुपये १००/- असून अधिक माहितीसाठी ९४२२०४३०२५ या क्रमांकावर संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page