राष्ट्रीय काँग्रेसच्या मालवण – देवगड तालुका निवडणूक प्रमुखपदी अरविंद मोंडकर…

⚡मालवण ता.१४-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर यांची काँग्रेसच्या मालवण – देवगड तालुका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख व प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी अरविंद मोंडकर यांना दिले आहे.

मालवण व देवगड तालुक्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समिती तसेच मालवण नगरपरिषदेसाठी निवडणूक प्रमुख म्हणून आपली नियुक्ती करण्यात येत असून उमे‌द्वारांचे अर्ज मागवणे, उमेदवार निवडीची पक्रिया राबवणे, आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी संदर्भात चर्चा करणे हे सर्व अधिकार आपल्याला देण्यात येत आहेत. ही सर्व कामे त्या-त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तसेच जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून आपण दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल याची पक्षाला खात्री आहे, असे अरविंद मोंडकर यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

You cannot copy content of this page