भरधाव ब्रेझा कारची दुचाकीला जोरदार धडक…

सावंतवाडी : भरधाव ब्रेझा कारने समोरुन येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात जुन्या मुंबई गोवा महामार्गावर माजगाव तांबळगोठण येथे दुपारी तीन वाजता घडला. फारूक हेरेकर (वय ५०, रा. माजगाव गरड) असे त्यांचे नाव आहे त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन अधिक उपचाराकरिता गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले.
याबाबत अधिक माहीती अशी की, जखमी फारुख हा आपल्या ताब्यातील दुचाकीने माजगाव वरून बांद्याच्या दिशेने जात होता, याच दरम्यान बांद्यावरून सावंतवाडीच्या यश आनंद पडते (वय 27 )रा. शिरोडा नाका,सावंतवाडी हा आपल्या ताब्यातील ब्रेझा कार भरधा वेगाने चालवत येत होता. माजगाव तांबळगोठन येथे वळणावर ब्रेजा कारची समोरून येणाऱ्या फारुक याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत फारुखा रस्त्यावर फेकला गेला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघात घडताच त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी जखमी आरोग्याला उपचाराकरता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कारची धडक एवढी जोरात होती की अपघात स्थळावरून कारने दुचाकीला तब्बल 100 मीटर पेक्षा जास्त फरफटत नेले. या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारच्याही दर्शनी भागाचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळतात सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश जाधव तसेच श्री गावकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. दरम्यान जखमी फारुख याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचार करता त्याला गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर या अपघाताबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात लोन करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

You cannot copy content of this page